अण्णाभाऊ साठे यांची जयंती औशात उत्साहात साजरी..

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती औशात उत्साहात साजरी..अण्णाभाऊ साठे यांची जयंती औशात उत्साहात साजरी..
औसा प्रतिनिधी

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले नगर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे चौक औसा येथे आज दिनांक 1 अॉगस्ट मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन करण्यात आले. यावेळी पवार म्हणाले अण्णाभाऊ साठे यांचे कार्य हे सर्वांना प्रेरणा देणारे असून त्यांच्या कार्याचा आदर्श जपला पाहिजे आणि आपल्या शाहिरी व साहित्याच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या शिकवणीचे आचरण केले पाहिजे असे यावेळी उपस्थितांना सांगितले.या जयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर सचिन रणदिवे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधीक्षक रामदास इंगवले,औसा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, गटनेते सुनील उटगे, शिवसेना जिल्हा संघटक जयश्रीताई उटगे, भाजप शहराध्यक्ष लहु कांबळे, युवा कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हणमंत राचट्टे, शहराध्यक्ष शकील शेख, सामाजिक कार्यकर्ते सदानंदप्पा शेटे, कल्पना ताई डांगे,मंजूषा हजारे, अगंद कांबळे, बाजार समितीचे संचालक विकास नरहरे, इम्रान सय्यद शिवरुद्र मुर्गे, नितीन शिंदे, अविनाश पुंड, संतोष कसबे, पवन कांबळे, विशाल कसबेसोमेश्वर वागदरे,आबा बनसोडे, रुपेश कांरजे,दत्ता पुंड, यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *