आज च्या युगात आधुनिक शिक्षण काळाची गरज : मौलाना इब्राहीम

आज च्या युगात आधुनिक शिक्षण काळाची गरज : मौलाना इब्राहीम*

सोलापूर – आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रातील आधुनिक शिक्षण घेणे ही काळाची गरज बनली आहे,

संगणक व इंटरनेटचा उपयोग करताना काळजीपूर्वक करावा त्याचे दुषपरिणाम थोडे असले तरी पण फायदे अधिक आहेत. संगणक शिक्षण आपणास जगाच्या आधुनिक शिक्षणाकडे समावून घेतो म्हणून आज हे शिक्षण आपण आपल्या पाल्याना जरूर शिकवावे, असे आवाहन जमियत उल्मा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना इबराहीम कासमी यांनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी नूर एज्युकेशन ट्रस्ट संचलित नूर कॉम्युटर सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
संस्थेचे अध्यक्ष नजीर मुन्शीनी आपल्यासाठी ही शिक्षणाची संधी गरीब व होतकरू पाल्यांसाठी करून दिल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक ही केले. प्रथम नजीर मुन्शीनी उपस्थितांचे स्वागत करत संस्थे विषयी माहिती विषद केली. सचिव इकबाल अन्सारी यांनी प्रमुख पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

डॉ. शफी चोबदार यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत म्हणाले, आयुष्यात वेळेला फार महत्व आहे.

आपला हे अमुल्य वेळ शिक्षण घेण्यासाठी वापरावा कारण वयानुसार काळ बदलत जातो, शिक्षण बदलत जाते आज आम्ही आधुनिक शिक्षणाकडे जास्त लक्ष केंद्रीत केले तरच आपला अस्त्विव आपण टिकवू शकतो.
सुत्रसंचलन महेमुद नवाज यांनी तर आभार इकबाल अन्सारी यांनी मानले.
यावेळी डॉ. जैनोद्दीन पटेल, मौलाना हाफीज सज्जाद शेख, उर्दूचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शफी चोबदार, खादिमाने उर्दूचे सहसचिव महेमूद नवाज, इंजिनियर कुद्दूस बागबान, महाराष्ट्र उर्दू शाळचे जुबेर हिप्परगी, उर्दू अदबी कॉन्फरन्सचे शफी कॅप्टन, शमा शिक्षण मंडळचे अय्युब नल्लामंदू,अकील मुन्शी, अब्दूल रहमान, इक्बाल बागबान, आदि उपस्थित होते.

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *