जडीबुटी दिनानिमित्त आयुर्वेदिक वनस्पती व रोपांचे निःशुल्क वितरण

जडीबुटी दिनानिमित्त आयुर्वेदिक वनस्पती व रोपांचे निःशुल्क वितरण

लातूर दि ४ : परमश्रध्देय आयुर्वेद शिरोमणी आचार्य बालकृष्णजी महाराज यांचा जन्मदिवस ०४ ऑगस्ट हा जडीबुटी दिवस म्हणून संपूर्ण देशात व जगात साजरा केला जातो.

लातूरच्या गांधी चौकामध्ये पतंजली योगपीठ परिवार व पतंजली मेगास्टोर चंद्र नगर शाहू कॉलेज समोर लातूर यांच्या सयुंक्त विध्यमानाने जडीबुटी दिवस साजरा करण्यात आला. विविध बेटावरून व जंगलामधील जडीबुटीचे निःशुल्क महत्व सांगून वितरण करण्यात आले.

गुळवेल, तुळस, अश्वगंधा, कोरफड, पानफुटी, करंज, बेल, कांडवेल, निवडुंग अपामार, लोखंडीसाल, हाउजोड, आवळा, पिंपळ, लिंब, कवट, आपटा, चिंच, बिबा, पुदिना, जांभूळ, अशा इतर अनेक जडीबुटीची माहिती दिली व निःशुल्क वितरण करण्यात आले.

सदरील कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून भा ज पा चे ग्रामीण जिल्हाअध्यक्ष श्री दिलीपराव देशमुख मालक, शहर जिल्हाअध्यक्ष श्री देविदास काळे, युवा मोर्चा प्रमुख अजितसिंह शिवाजीराव पाटील कव्हेकर, राष्ट्रीय योगासन खेल महासंघाचे वित्तीय संचालक योगाचार्य विष्णूजी भुतडा, यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.

भारत प्राथमिक विद्यालया चे विध्यार्थी / विध्यार्थीनी नी प्रभात फेरी काढून या जडीबुटी उत्सवामध्ये सहभाग नोंदवला. तसेच वेदांत बालक मंदीर मधील चिमुकल्या विध्यार्थ्यानी वृक्ष दिंडी काढत दरवर्षी एक झाड लावण्याचा संकल्प केला. वैध्य रघुनाथ अवधूत यांनी आयुर्वेदीक वनस्पतीची व रोपांची माहिती दिली.

सदरील कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पतंजली योगपीठ परिवाराचे जिल्हाअध्यक्ष राम घाडगे, डॉ व्यंकटेश सिद्धेश्वरे, मल्लिकार्जुन रोडगे, ज्ञानोबा शिंनगिरे, गुणवंत विळेगावे, हरिभाऊ काळे, यादव रामस्वरूप, सौ ललिता अष्टुरे, सौ अनिता कुसनूरे,राजाभाऊ खंदाडे, बाबासाहेब सूर्यवंशी, निशांत देशमुख, किरण सगरे, वैजनाथ पाटील, ऍड लक्ष्मण शिंदे, शिवाजीराव वाघमारे, सौ उमा घाडगे, सुभाष राऊत, राजेंद्र मोगरे, मदने, जाधव, बाळासाहेब चाकूरकर, नारायण भुतडा इत्यादींनी परिश्रम घेतले.

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *