जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रामध्ये आरोग्य शिबीर उत्साहात

जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रामध्ये आरोग्य शिबीर उत्साहात


लातूर, दि. 3 : शाळा व अंगणवाडीतील शून्य ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करण्यासाठी दर बुधवारी स्त्री रुग्णालय परिसरातील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात (डीईआयसी) आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये हार्मोन्ससंबंधित आजारांवर उपचार केले जातात.

2 ऑगस्ट रोजी झालेल्या आरोग्य शिबिरात संदर्भित करण्यात आलेल्या 28 बाल रुग्णांवर वेगवेगळ्या आजारांवर हार्मोन्स तज्ज्ञ डॉ. विजय ढवळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. अशोक धुमाळ व वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा रोकडे यांच्या पथकाने उपचार केले. डीईआयसी व्यवस्थापक नदाफ अलीम व इतर अधिकारी, कर्मचारी यांनी शिबिरास सहकार्य केले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली दरबुधवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक सारडा, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. आनंद कलमे यांनी केले आहे.

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *