डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य

डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य

 

 

अकादमी चा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 6 ऑगस्ट रोजीडॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य
लातूर- डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचे हे 15 वे वर्ष आहे.सन 2022 चे पुरस्कार वितरण सोहळा स्थळ-भालचंद्र ब्लड बॅक, बस स्टॅड शेजारी, गांधी मार्केट लातूर येथे रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.एस.एन.बोडके( अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर )प्रमुख पाहुणे डॉ.रविंद्र शोभणे (कांदबरीकार व कथाकार अध्यक्ष नियोजित 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ,अमळनेर), श्री.अविनाश देवशटवार( प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, लातूर),प्रा.डॉ.राजकुमार मस्के(ज्येष्ठ साहित्यीक , प्राचार्य महाराष्ट्र उदयगिरी महाविदयालय ,उदगीर)यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्याच बरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार अ‍ॅड.अजय कलशेटटी यांना दिला जाणार आहे.
तरी या पुरस्कार वितरण कार्यक्रमास साहित्यीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अ‍ॅड.एस.एन.बोडके ,प्रा.डॉ.माधव गादेकर उपाध्यक्ष,अ‍ॅड.प्रा.श्रीधर गायकवाड कार्याध्यक्ष, प्रकाश घादगिने सचिव, अ‍ॅड.अंगद व्ही गायकवाड सहसचिव,वामन गो कांबळे कोषाध्यक्ष, सदस्य उत्तम दोरवे,छगन घोडके,अर्जुन कांबळे,नागनाथ कलवले,डॉ.संजय जमदाडे,सौ.कुसुमताई सं.बोडके, सौ.वंदना मा.गादेकर यांनी केले आहे.

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *