लातूर मध्ये प्रभुराज प्रतिष्ठाण च्या वतीने मनपाने सोय

लातूर मध्ये प्रभुराज प्रतिष्ठाण च्या वतीने मनपाने सोय

करून दिलेल्या खड्ड्यात विसावा घेत लक्षवेधी गांधीगिरी…..मनपा लातूर महानगर पालिकाचा सार्थ अभिमान…

लातूर प्रतिनिधी

दि.०२.८.२०२३ रोजी पोस्ट ऑफिस बसस्थानक मागील परिसरात प्रभुराज प्रतिष्ठाण लातूरच्या वतीने बोलके फलक घेऊन गांधीगिरी……
लातूर शहरात सर्वत्र ठिकाणी सावेवाडीतील पूर्ण रस्ता , बसडेपो बाजूस समांतर रोड,गांधी चौक पोस्ट ऑफिस ते अग्रेसन भवन बसस्थानक मागील परिसर असे अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था चाळणी सारखी झाली आहे या रस्त्या चा वापर बाहेरून येणारे व शहरातील जनता जास्त प्रमाणात वापर होतो त्यात असलेले खड्डे ही जनतेला त्रास दायक ठरत आहेत याची दुरुस्ति उनाळ्यांत कांही महिन्यात पूर्वी केली होती तरीही रस्त्याची दुरअवस्था झाली हे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे दिसून येते या निष्काळजीपानामुळे जनतेला त्रास सहन करावे लागतं आहे. पावसाळ्यात खड्डे पडत असल्याने याची दक्षता घेण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरत आहे. गुत्तेदार व मनपा अधिकारी यांच्या संगमताने अश्या कामाची सुरवात होत असल्याचे दिसून येते. पण जनता मनपाचा कर लाखो रुपयांच्या स्वरूपात भरणा करून देखील मनपा प्रशासन जणतेला चांगल्या दर्जेचा रस्ता व मूलभूत सोई देऊ शकत नाही याची खंत जनतेला वाटत आहे. याबाबी मनपा करत नसल्याने जनतेत रोष होत आहे.या रस्त्याचा वापर मनपा कर्मचारी व प्रतिनिधी ही करीत असतील तरीही या कडे त्यांचेही दुर्लक्ष होत आहे.तसेच गल्ली पासून मेन रोड प्रत्तेक ठीकानी खड्डेच खड्डे दीसून येतात त्यात पावसाचे साचलेले पाणी यामुळे खड्ड्याचा अंदाज लागत नासल्याने अपघात होत आहे.याचा त्रास सर्व सामान्य जनतेस होतोच पण वाहनधारक खड्डा चूकवीन्या प्रयत्नात आपघातास समोरे जातो व शाररीक आजार मनक्याचा,पाठीचा कमरेच्या त्रासापासून नागरीक परेशान झाला आहे यात वीद्यर्थीनांही मोठा त्रास सहन करावा लागत आहे यासर्व बाबी बाबत मनपा च्या निदर्शनास आणून सुद्धा या गांभीर्य बाबीकडे दूर्लक्ष करीत प्रशासन गांभीर्यने घेत नाही खड्ड्याबाबत प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने “अँड. अजय कलशेट्टी” यांच्या नेत्रत्वात गांधी चौक पोस्ट ऑफिस परिसरात “मनपा लातूर महानगर पालिकाचा सार्थ अभिमान….जिकडे तिकडे खड्डेच खड्डे आणि खड्ड्यात पाणीच.. पाणी..असे बोलके फलक घेऊन मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.यावेळी ,डॉ.संजय जमदाडे, यु.एस.मश्याक, एम. एम. पाटील,हुसेन पठाण,पारस चापसी,सचिन गोलावार,तुषार इंगळे,अँड.अजय कलशेट्टी युवराज बेल्लूरे, शिरीष माळी, दत्ता गायकवाड, मोतीराम कदम,हरीश चेटवानी अशोक पंचाक्षरी,विलास भूमकर,मुन्ना बट्टेवार, सुरेश कोटलवार,शिवा रोडे,सोमनाथ खुदासे,पारस चापसी,गोपाळ खंडागळे आदी उपस्थीत होते.

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *