Abhimanyu Pawar saheb, thanks

Abhimanyu Pawar saheb,

a well-liked member of the legislative assembly, is the representative.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून प्रभाग 04 मधील रस्त्याचे भूमिपूजन..Abhimanyu Pawar saheb, thanks

औसा/ प्रतिनिधी : – तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 04 मधील रस्त्याचे निधी उपलब्ध करून रस्ता मंजूर झाल्याने दि 29 जुलै 2023 शनिवार रोजी या रस्त्याचे भूमिपूजन करून आमदारांचे आभार मानण्यात आले.

शहरातील प्रभाग क्रमांक 04 भाग परिसरातील सारोळा रोड ते चक्रधर शाळा येथे जाण्यासाठी रस्ता नव्हता. शालेय विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी रस्त्यात पावसाळ्यामुळे दलदलीचे स्वरूप आल्याने हा रस्ता चिखलमय बनला आहे. परिसरांतील भाग नवीन हद्दीत असल्यामुळे या भागात विकास कामे झाले नाही. सदर प्रभागा मध्ये नवीन वस्ती झाल्याने तसेच या प्रभागात शहरातील नामांकित चक्रधर व स्पर्श शाळा असल्याने या शाळेसाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींना तसेच परिसरातील नागरिकांना येण्या -जाण्यासाठी रोड नव्हता.

परिसरातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. या भागात चिखल व दलदलीचे स्वरूप आल्याने प्रभागात हा रस्ता मंजूर झाल्याने या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्याकरिता निधी मंजूर झाल्याने रस्त्याचा भुमिपुजन भाजप औसा पालिकेचे माजी गटनेते सुनीलअप्पा उटगे यांच्या शुभहस्ते करून रस्ता कामांचा शुभारंभ करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक कंठप्पा मुळे, शहराध्यक्ष लहु कांबळे, संजय माळी, तालुका सरचिटणीस प्रा शिवरुद्र मुर्गे, भाजप युवा नेतृत्व इम्रान सय्यद, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर परवेज काझी, जाधव कन्स्ट्रक्शनचे मंगेश जाधव, नेताजी जाधव, चक्रधर शाळेचे मुख्याध्यापक सुलतान शेख, सुमित दीक्षित, यांच्यासह आदी उपस्थित होते, Abhimanyu Pawar saheb

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *