मुख रस्ता हाशमी चौक ते बसस्थानक पर्यंत असलेले रसत्याच्या दोन्ही बाजुचे गटारी त्वरित साफ सफाई करण्यात यावे.

                                                                                                                       

 

औसा सोमवार रोजी औसा नगर परीषदेचे मुख्याधिकारी यांच्या कडे एम आई एम च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे की सध्या पावसाळ्याचे दीवस चालु असुन औसा शहरात सर्वत्र घाणीचे सार्माज्य झालेले आहे, औसा शहराच्या मुख्य रसत्या लगत असलेल्या गटारीवर अतिक्रमण केल्यामुळे गटारी मध्ये पावसाचे पाणी जात नसल्याने सदर पाणी घरामध्ये घुसत आहे.

लोकांच्या जिवितास धोका निर्माण झालेला आहे तरीही मुख रस्ता हाशमी चौक ते बसस्थानक पर्यंत असलेले रसत्याच्या दोन्ही बाजुचे गटारी त्वरित साफ सफाई करण्यात यावे. प्रभाग क्र ३मधील , हाशमी नगर ,कादरी नगर , जे के नगर , नबी नगरआदर्श नगर ,

या परीसरात घाणीचे साम्राज्य झाले आहे तसेच या परीसरात औरबिट स्कूल,चक्रधर शाळा , ब्लाँजम इग्लिश स्कूल, आदिबा ऊर्दू शाळेजवळ असलेले रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने चिखल होऊन या परीसरातील शालेय विध्यार्थी व जेष्ठ नागरिकांना चालता फिरता येत नसल्याने दुखापत होन्याची शक्यता निर्म*तरीही सदर प्रभागामध्ये असलेले रस्त्यावर त्वरित मुरुम टाकुण पसरून देण्यात यावे.*

नगर परिषद औसा च्या स्वच्छता विभागा अंर्तगत घंटागाडी चे नियोजन करण्यात आले असुन सदर घंटागाडी ही प्रभाग क्र. ३ मध्ये असलेले नागरीकांच्या घरामधील कचरा घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच ओला व सुका कचरा नागरीकांच्या घरातील घेऊन सदर घंटागाडी चे कर्मचारी घेऊन रस्ता च्या बाजूला टाकण्यात येतो या घंटागाडी चे कर्मचारी यांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत तरीही मुख्याधिकारी साहेबांनी या मागणी कडे लक्ष देऊन मागण्या मान्य करावे.

अन्यथा लोकशाही पध्दतीने नगर परीषद कार्यालय समोर अंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावीअसा इशारा एम आई एम च्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.यावेळी एम आई एम चे अँड.गफरुल्लाहा हाशमी, सय्यद कलिम, सय्यद जमिरोद्दीन,पटवेकर मुक्तदीर,निसार पठाण आदिची उपस्थिती होती.

Ausa Hashmi Chowk,Laur/औसा सोमवार रोजी औसा नगर

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *