*औसा नगर पालिकेची भोगवाटदार लाभार्थ्यांना घरकुलसाठी नकार घंटा !*
*मालकीहक्काच्या जाचक अटी मुळे हजारो घरकुल लाभार्थी वंचित*

औसा पालिकेने मालकी हक्काची जाचक अट रद्द करावी

…..
औसा :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरातील व ग्रामीण भागातील कोट्यवधी बेघर लाभार्थी साठी प्रधानमंत्री घरकुल योजना आमलात आणली सदर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना कसा मिळणार नाही याची प्रशासनातील झारीतील शूक्रार्चानी लाभार्थ्यांना बेकादेशीर कागदपत्रांच व निकषाचा ससेमिरा लाऊन लाभार्थ्यांना या घरकुल योजना पासून वंचित ठेवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव येथील नगर पालिकेच्या कार्यभारावरून दिसून येते घरकुल योजनेचा लाभ घेताना गोरगरीब लाभार्थ्यांना आपल्या मालकी हक्काचा पुरावा मागितला जात आहे मुळात बेघराना यांना घरे या संकल्पनेतून मा् पंतप्रधानयानी ही योजना सुरू केली मुळात नगर पालिकेच्या मालकी हक्कात भोगवाटदार यांची नौद आठ वर येते भोगवाटदार यांची नोद मालकी हक्कात येत असताना मग अशा लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात प्रकार पालिके मार्फत सुरू आहे सदर भोगवाटदाराची जाचक अट रद्द करावी अशी मागणी शहरातील गोर गरीब लाभार्थी करत आहे …….
औसा नगर परिषद तर्फे प्रधानमन्त्री आवास योजनेंसाठी अर्ज भरून घेण्यात आले होते, ते अर्ज छाननी करून किमान 200 ते 300 अर्ज हे त्रुटि मध्ये काढले ,त्रुटि मध्ये सर्वात जास्त अर्ज न. प. चामालकी 8 अ नाही असा उल्लेख आला,परंतु महाराष्ट्रातील अनेक तालुक्यात शासकीय जागा, भोगवाटदार, खाजगी जागा,ज्यांचे 3वर्षा पासून कब्जेदार आहेत अश्या लाभारत्यांचे स्थळ पाहनी करून त्या न. पा.नी जास्ती जास्त नागरिकांना प्रधानमन्त्री आवास योजनेचा लाभ मिळून दिला

आहे मग
औश्या तील न.पा. 8 अ मालकी रकाण्याताच नाव पाहिजे ही अट घातली आहे,
म्हणून आज मुख्यधिकारी न. प. औसा यांना न. प.8 अ मधील भोगवाटदार,शासकीय जागा (झोपडपट्टी),नवीन न. प.हद्दीतील खाजगी जागा मालक ज्यांचे 7/12, किंवा पी. आर कार्ड,आहे अश्या सर्व प्रधानमन्त्री आवास योजने अंतर्गत सादर केलेल्या अर्जदारांच्या अर्ज शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात यावा जास्ती जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळउन द्यावा ,
यासाठी नगर परिषद मुख्याधिकारी औसा यांना निवेदन देण्यात आले
सामाजिक कार्यकर्ते उमर पंजेशा सोबत फारुख भाई करपुडे यानी अशी मागणी केली आहे .
न. प. लिपिक काझी मुदासिर अली यांच्या मार्फत मुख्याधिकारी औसा यांना निवेदन देण्यात आले..

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *