Bhada Shivli is the road/ausa But due to the negligence of the

आवश्यक अति आवश्यक नसलेल्या ठिकाणी काम होत आहे

औसा
भादा शिवली हा रस्ता भा दा येथे पोलीस स्टेशन,प्राथमिक आरोग्य केंद्र,जिल्हा मध्यवर्ती, बँक वीज वितरण कार्यालय, तलाठी कार्यालय असल्यामुळे आजूबाजूच्या खेड्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आणि संपर्क भा दा या गावाशी असल्याने हा रस्ता चागला दुरुस्त होणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता अडगळीला पडला असून याचे काम गेल्या अनेक वर्षापासून न झाल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे यामुळे हा रस्ता आमदार खासदारांची गाडी येईल तेव्हा तरी नक्कीच होईल अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे.म्हणून या बाबीकडे प्रशासनाने गांभीर्याने

घेऊन हा रस्ता मजबुतीकरण व्यवस्थित रित्या होणे आवश्यक असल्याचे मत या भागातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
नुकतीच पेरणी करण्यात आलेली आहे या पेरणीसाठी शेतकरी या रस्त्यावरून जाताना अनेक वेळा घसरून पडून वाहनाचे नुकसान स्वतःच्या शरीराचे नुकसान आणि अनेक मुके पशुधन या चिखलाचा त्रासामुळे त्रस्त झाले आहेत तरीही या रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडून पावसाचे पाणी थांबून आणि या रस्त्यावरून उन्हाळ्यामध्ये तलावातील काळी माती वाहतूक करण्यात आल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात त्या मातीचा खच साचला असून त्यावर पावसाचे रिमझिम पाणी पडताच त्या काळ्या माती चिखल तयार होऊन त्या चिखलातून जात असताना वाहने, पशुधन आणि या रस्त्यावरून प्रवास करणारे शेतकरी, शेतमजूर, पुढील गावास जाणारे वाटसरू आधी नागरिकांना या चीखलमय रस्त्याचा मोठा त्रास होत आहे तर नुकताच या रस्त्यावरती भादा येथील ग्रामपंचायत सदस्य योगेश लटुरे यांनी आमदार रमेश कराड यांच्याकडे जाऊन पाठपुरावा करून दोन किमी अंतरासाठी मातोश्री रस्त्याची मंजुरी आणली आणि रस्ता कामात सुरुवात केली परंतु दोन शेतकऱ्यांच्या हिरव्या दाव्यामध्ये या रस्त्याचे भाग क्रमांक एक चे काम थांबविण्यात आले आणि भाग क्रमांक दोन या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्याची हरकत नाही अशा ठिकाणापासून त्या कामास प्रारंभ करण्यात आला यामुळे खरा रस्ता हा पाठीमागे खराब असून त्या रस्त्यावरून वाहतुकीसाठी येणाऱ्या प्रत्येकास त्रास होतो त्यामुळे हा रस्ता सुरुवात होणे अत्यंत महत्त्वाचे होते.
यामुळे रोग म्हशीला आणि इंजेक्शन खालील अशी अवस्था हा रस्ता सुरू करण्यात आल्याने झाल्याचे मत अनेक शेतकरी नागरिक व्यक्त करीत आहेत यामुळे हा रस्ता गावाकडून सुरुवात होऊन त्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे परंतु या बाबीकडे स्थानिक पुढारी ते आमदार खासदारापर्यंत कोणीही दखल घेण्यास तयार नाही.
ज्यामुळे या रस्त्याचे काम गावाबाहेर पासूनच आणि आवश्यक अति आवश्यक नसलेल्या ठिकाणी काम होत आहे अशी चर्चा सध्या शेतकऱ्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
भादा शिवली रस्ता हा अत्यंत खराब झाला असून या रस्त्याने आमदार खासदारांची गाडी वळवा आणि शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना कळवा अशी परिस्थिती झाल्याने शेतकऱ्यांना या रस्त्याचा मोठा त्रास होत आहे.

Exit mobile version