deoni taluka मस्जिद च्या नावाने नोंद असलेली जागा नगरपंचायतने केली रद्द.....

deoni taluka मस्जिद च्या नावाने नोंद असलेली जागा नगरपंचायतने केली रद्द…..!

नगरपंचायत समोर दोन तास मुस्लिम समाजाचा ठिय्या आंदोलन

देवणी प्रतिनिधी

देवणी शहरातील गडीवरील जमिनित मस्जिद च्या नावाने नोंद असलेली जागा रद्द केल्याने नगरपंचायत समोर दोन तास मुस्लिम समाजच्या वतीने ठिय्या आंदोलन करून नगरपंचायतला निवेदन देण्यात आले

 

.या निवेदनात असे म्हंटले आहे की.देवणी शहरातील जमीनीत सर्वे न ५३९९ मध्ये ६२ बाय ४० ची मस्जिद च्या नावे नमुना ८ अ. वर नोंद होती. व तसेच वक्फ ट्रंबनल कोर्ट औरंगाबाद sut no ३११/२०२२ दिनांक ०१/०४/२२ रोजी स्टे असताना सुध्दा देवणी नगर पंचायत ने मस्जिद च्या नावे असलेला नमुना न ८ अ खारीज केल्याने, मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी नगर पंचायतिच्या समोर निवेदन देण्यासाठी शेकडो संख्येने नागरिकच्या उपस्थित नगराध्यक्षा किर्तीताई घोरपडे याना निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी नसल्याने परत सोमवारी निवेदन कृत्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे.वरील सर्व प्रकार पाहता आसाच प्रकार मुस्लिम समाजाच्या समशान भूमी बाबत घडला असल्याचे काँग्रेस च्याच काळात ग्राम पंचायत आणि नगर पंचायत सत्तेवर असताना असे प्रकार वारवर घडत असल्याचे मुस्लिम समाजातील नागरिकांचे म्हणणे आहे.
यावेळी निवेदनावर वक्फ कमिटीचे आद्यक्ष जीलानी बुधलेघर,एम आय एम चे अध्यक्ष फय्याज शेख, मौलाना हाफिज नयुम,जावेद तांबोळी, आलिम टेलर, सलीम उंटवाले, करीम शेख, मैनोदीन शेख, सादक खुरेशी ,अहमद सय्यद,इसूब बुधलेघर, मन्सूर पठाण, मुजीब शेख ,सुलतान मल्लेवाले ,मौजूद शेख ,नवाज शेख ,काशीम बुधलेघर ,आजर कुरेशी, इस्माईल तांबोळी, अन्वर तांबोळी, अखिल तांबोळी, नवाब शेख, फिरोज शेख यांच्या सह अनेक मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या व शेकडोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *