latur The local police detained two

latur The local police detained two suspects involved in stealing

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.*

चैन स्नॅचिंग मधील दोन आरोपींना अटक. 74.3 ग्राम सोन्याचे दागिने,गुन्ह्यात वापरलेली, चोरीची मोटरसायकल असा एकूण 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 6 गुन्हे उघड.पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते.

त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) श्री.भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते.सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
दरम्यान 30/07/2023 पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेले सोन्याचे दागिने सराफांना विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या 2 आरोपींना जुने रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे

नाव

1) रोहन उर्फ मिट्या मारुती गुंडले, वय 19 वर्ष, राहणार अंजनसोंडा, तालुका चाकूर जिल्हा लातूर.
2)अभंग काशिनाथ घोलपे, वय 29 वर्ष राहणार काळेवाडी तालुका शिरूर अनंतपाळ ,जिल्हा लातूर.
असे असल्याचे सांगितले. त्यावरून नमूद आरोपींना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी मागील काही दिवसापासून लातूर शहरातील व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटारसायकल वरून येऊन हिसका मारून जबरीने चोरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले.

त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता पोलीस ठाणे एमआयडीसी येथील चैन स्नॅचिंग चे 2 गुन्हे, पोलीस ठाणे गांधीचौक येथील 1 गुन्हा, पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथील 1 गुन्हा, पोलीस ठाणे एमआयडीसी येथील मोटरसायकल चोरीचा 1 गुन्हाउदगीर शहर येथे दाखल असलेला 1 गुन्हा तसेच पोलीस ठाणे असे दाखल असल्याचे दिसून आले आणि ते सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपींनी वर गुन्ह्यात चोरलेला सोन्याचे 74.3 ग्रॅम वजनाचे 5 मंगळसूत्रे तसेच एक पोलीस ठाणे चोरीची मोटारसायकल व असा एकूण 3,15,300/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, नाना भोंग, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख,नकुल पाटील यांनी केली आहे.

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *