Latur vivekanand chowk police station

Table of Contents

Latur vivekanand chowk police station

विवेकानंद चौक पोलीस स्टेशनची कारवाई. कारागृहातून रजेवर सुटून 3 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे येथून अटक.*

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे सन 2014 मध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी नामे
1)परमेश्वर शंकर जाधव, वय 37 वर्ष, राहणार एलआयसी कॉलनी, सहयोग नगर, रिंग रोड, लातूर.
हा सन 2020 मध्ये चार आठवड्याच्या संचित रजेवर औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह, हार्सूल मधून बाहेर पडला होता.संचित रजा संपल्यावर तो कारागृहात दाखल न होता फरार झाला होता.यासंदर्भात कारागृह पोलिसांनी दिलेल्या फिर्याद वरून नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कारागृहातून रजेवर आल्यानंतर तीन वर्षापासून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री. Soyam munde यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पथक तयार करून फरार आरोपीचा विविध मार्गाने शोध घेण्यात येत होता. नमूद पथकाने सदर आरोपी वास्तव्य करण्याची शक्यता असलेले विविध ठिकाणी भेटी देऊन बातमीदार तयार केले होते.
दरम्यान बातमीदाराकडून मिळाले मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून फरार आरोपी नामे परमेश्वर शंकर जाधव हा पुणे येथे ओळखलं पाहून राहत असल्याचे पथकाला समजले.त्यावरून दिनांक 28/07/2023 रोजी सदरचे पथक पुणे येथे पोहोचून नमूद आरोपी परमेश्वर जाधव यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे आणण्यात आले. पुढील कार्यवाही करिता मा. न्यायालय लातूर येथे हजर करून त्यास परत औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह हरसुल येथे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कांबळे, सहाय्यक फौजदार विलास फुलारी, पोलीस अमलदार दिनेश हवा, नलवाड यांनी केली आहे.

Exit mobile version