Pandit Bhatkhande Music Festival in Ausa

Pandit Bhatkhande Music Festival in Ausa

Embracing the Enchanting Melodies: Pandit Bhatkhande Music Festival in Ausa

औसा येथे पंडित भातखंडे संगीत समारोहाने रसिक मंत्रमुग्ध

औसा प्रतिनिधी
औसा येथील माऊली प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिर सभागृहामध्ये दिनांक 4 ते 6 ऑगस्ट 2023 या तीन दिवसीय कालावधीमध्ये पंडित भातखंडे संगीत समारोहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. माऊली प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे हे 12 वे वर्ष असून पंडित भातखंडे संगीत समारोहाच्या तपपूर्ती निमित्त ख्यातनाम गायक व कलावंताची मेजवानी अवसेकर रसिकांना मिळत असून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी मधुवंती बोरगावकर पुणे यांचे सुमधुर गायन झाले. रविवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी या संगीत समारोहाचा समारोप होणार असून आज सुप्रसिद्ध गायक व संगीतकार कलावंताची मेजवानी मिळणार आहे. या कार्यक्रमांमध्ये श्रुती बोरगावकर, अविनाश यादव, चैतन्य पांचाळ, शिरीष बोकील, हरीश कुलकर्णी ,सरस्वती बोरगावकर,प्राजक्ता काकतकर, मनोज सोळंकी, पंडित किरण भावठाणकर, शिल्पा आठल्ये, पंडित विठ्ठलराव जगताप, कल्याणी जोशी, ,स्वरीत पांचाळ, मधुवंती बोरगावकर पुणे, पंडित मिलिंद चीत्काल,कपिल जाधव, वैशाली देशमुख, पंडित उपेंद्र भट ,अंगद गायकवाड, सारंग कुलकर्णी, पंडित शिवरुद्र स्वामी यांच्यासह यांच्यासह अनेक गायकांचे सुंदरी वादन, हार्मोनियम, तबला व पखवाज सोलो इत्यादी भरगच्च कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध होत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माऊली प्रतिष्ठानचे पंडित शिवरुद्र स्वामी विठ्ठलराव राऊतराव यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रयत्नशील असून मंदिर समितीचे अध्यक्ष ऍड मुक्तेश्वर वागदरे, रविशंकर राजट्टे, प्रा युवराज हलकुडे, धनंजय कोपरे, उमाकांत मुर्गे ,प्रकाश वाघमारे, ऍड भीमाशंकर कारंजे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

By sachboltanews.com

I'm Transport service provider in Maharashtra gramen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *