Pradhan Mantri Kisan Samriddhi Kendra will be inaugurated at

प्रधानमंत्री किसान समृद्धी केन्द्राचे औसा विधानसभा मतदारसंघात 9 ठिकाणी होणार उद्घाटन-जिला प्रभारी संतोष मुक्ता
औसा
सध्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कृषी सेवा घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून या सर्व सुविधा एकाच ठिकाणी देण्याचा सरकारचा प्रयत्न असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र हे शेतकऱ्यांना वन स्टाॅप शाॅप म्हणून काम करेल याअंतर्गत औसा विधानसभा मतदारसंघात (दि.२७) जुलै रोजी ९ ठिकाणी या प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन होणार असल्याची माहिती औसा विधानसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता यांनी बुधवार (२६) रोजी औसा येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, बाजार समितीचे सभापती शेखर सोनवणे, उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे,भाजपचे माजी गटनेते सुनील उटगे, भाजपचे औसा शहरध्यक्ष लहू कांबळे, प्रा सुधीर पोतदार, बाजार समितीचे संचालक रमाकांत वळके, गोविंद भोसले, भिमाशंकर मिटकरी, आदी उपस्थित होते. यावेळी संतोष मुक्ता यांनी सांगितले की प्रधानमंत्री सेवा केंद्राचे अनेक फायदे शेतकऱ्यांना होणार आहेत. शेतमालाचा दर्जा आणि कृषी उपयोगी साहित्याची किंमत नियंत्रणात ठेवणे शक्य होणार आहे. माती, पाणी, खते, बियाणे आदींची तपासणी या केंद्रावरून होईल. या केंद्रावरून आदर्श कृषी पध्दतीबद्दल जनजागृती करता येईल शेतकऱ्यांना प्रशिक्षण देता येणार आहे याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचा लाभही शेतकऱ्यांना घेता येणार आहे. देशात सुमारे २ लाख ८० हजार असे शाॅप आहेत. यापैकी १ लाख शाॅप प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रात परिवर्तीत करण्यात आले आहेत. उर्वरीत १ लाख ८० हजार शाॅप लवकरच या केंद्रात परिवर्तीत करण्यात येणार आहेत. आणि जिथे आवश्यकता आहे तिथे नव्याने समृद्धी केंद्राची उभारणी केली जाईल. हे केंद्र अद्यावत असणार आहेत. तिथे शेतीपूरक सर्व गोष्टी तर मिळतीलच पण आनलाइन पेमेंट ची सुविधा असेल आॅनलाइन प्रशिक्षणाची सुविधा असेल माती प्रशिक्षणासह ड्रोन सारख्या अद्यावत तंत्रज्ञान च्या प्रशिक्षण सुविधांही मिळू शकणार आहे.

आतापर्यंत पंतप्रधान मन कि बात च्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत होते. यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला जावा यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी किसान कि बात या माध्यमातून शेतीशी निगडित व्यवस्थेवर ते संवाद साधणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत संतोष मुक्ता यांनी सांगून नरेंद्र मोदी यांनी या ९ वर्षाच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या महत्वपूर्ण कामांची माहिती या पत्रकार परिषदेत दिली.

Exit mobile version