Vishnu Narayan Bhatkhande,Ltur/Ausa विष्णु नारायण भातखंडे

 विष्णु नारायण भातखंडे

 

भातखंडे संगीत समारोहातून रसिकांना नामवंत कला यात्रीची रसिकांना मेजवानी

औसा प्रतिनिधी

 

औसा येथील माऊली प्रतिष्ठान व माऊली संगीत विद्यालयाच्या वतीने 4 ते 6 ऑगस्ट असे तीन दिवसीय पं. भातखंडे शास्त्रीय संगीत समारोहाचे आयोजन मुक्तेश्वर मंदिरात करण्यात आले असून देशभरातील नामवंत शास्त्रीय गायक वादकांच्या कलेची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

यावेळी अभिरुपा पैंजने, श्रुती बोरगावकर, अविनाश यादव, चैतन्य पांचाळ, शिरीष बोकील, हरीश कुलकर्णी, सरस्वती बोरगावकर, पं. विठ्ठलराव जगताप, कल्याणी जोशी, प्राजक्ता काकतकर, मनोज सोळंके, पं. किरण भावठाणकर, शिल्पा आठल्ये, स्वरीत पांचाळ, मधूवंती बोरगावकर, पं. मिलिंद चित्ताल, कपिल जाधव, डॉ. वृषाली देशमुख, पं. सुप्रतिक सेनगुप्ता, पं. उपेंद्र भट, पं. अंगद गायकवाड, सारंग कुलकर्णी आणि पं. शिवरुद्र स्वामी यांच्या शास्त्रीय गायनाबरोबरच सतार, सुंदरी वादन आणि हार्मोनियम, तबला, पखवाज सोलो होणार आहे.

यावेळी पं. पांडुरंग मुखडे, पं. बाबुराव बोरगावकर, पं. दीपक लिंगे, तेजोवृष जोशी यांची साथसंगत होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून औसा नाथसंस्थांचे हभप. गहिनीनाथ महाराज, तहसीलदार भरत सूर्यवंशी, डॉ. राम बोरगावकर, सोनू डगवाले, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, डॉ. अजित जगताप, शिवसांब हुरदळे, अतुल देऊळगावकर, अ.भा. गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष पं. बाळासाहेब सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधीकरी रामदासजी इंगवले यांची उपस्थिती राहणार आहे.
या संगीत समारोहाचे बारावे वर्ष असून कार्यक्रम विनामूल्य आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष पं.शिवरुद्र स्वामी, सचिव व्यंकटराव राऊतराव, कोषाध्यक्ष हणमंत लोकरे यांनी केले आहे.

Exit mobile version